
नांदेड, 01 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात वादळी वारा व पावसाने कहर केला . त्यानंतर वादळीवारे, अवकाळी पावसाने झोडपले, या अवकाळीत काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी, हळद पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तर बहरात आलेला अंबा, चिकु, चिव केळीच्या बागांच मोठं नुकसान झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार शेकडो हेक्टरवरील पिकांच नुकसान झाले आहे. तर अर्धापूर व हदगाव तालुक्यातील सहा जनावरे वीज पडून ठार झाली आहेत.
जिल्ह्यात वादळीवारे व अवकाळीने नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करणे आवश्यक आहे. दरम्यान, पिकांचे, फळबागांचे व इतर नुकसानीची माहिती देण्याबाबत प्रशासनाची भूमिका उदासीन असल्याचे दिसत आहे. अर्धापूर, हदगाव, कंधार, भोकर, धर्माबाद, लोहा मुदखेड, मुखेड तालुक्याला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
अनेक तालुक्यांत काढणीला आलेला गहु, ज्वारी आडवी झाली आहे. त्यामुळे ज्वारी, गहू काळी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांच नुकसान झाल्यांच प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्याच बरोबर हळदीचं ही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. अर्धापूर, मुदखेड, भोकर तालुक्यात ्केळीच्या बागांच नुकसान झालं आहे आहे. अनेक तालुक्यांत बहराला आलेल्या अंब्याची मोठी पडझड झाल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच चिकु, टरबूज, खरबूज, चिंचाचेही नुकसान झाले.
वादळीवारा व अवकाळी मुळे अनेक भागांतील वरांवरील पत्रे उडाले तर अनेक ठिकाणांवरील सोलार पॅनल उडून नुकसान झाले आहे. तसेच काही भागात झाडे उन्मळून पडल्याच्या घटना ही घडल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis