खोलेश्वर, आम्लेश्वर मंदिरासह जोगाई मंडपाचे होणार संवर्धन
बीड, 01 एप्रिल, (हिं.स.)। जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ७ कोटी १० लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उपसचिव नंदा राऊत यांनी २७ आणि ३० मार्च २०२६ रोजी या संदर्भात
खोलेश्वर, आम्लेश्वर मंदिरासह जोगाई मंडपाचे होणार संवर्धन


बीड, 01 एप्रिल, (हिं.स.)। जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ७ कोटी १० लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उपसचिव नंदा राऊत यांनी २७ आणि ३० मार्च २०२६ रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे.

यामध्ये परळी, अंबाजोगाई, पाटोदा आणि माजलगाव तालुक्यातील महत्त्वाच्या राज्य संरक्षित स्मारकांचा समावेश आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार परळी येथील ऐतिहासिक धर्मापुरी किल्ल्याच्या जतन आणि दुरुस्तीसाठी सर्वाधिक २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अंबाजोगाई येथील प्रसिद्ध आम्लेश्वर मंदिर, खोलेश्वर मंदिर आणि जोगाई सभामंडपाच्या संवर्धन कामांनाही यामुळे मोठी गती मिळणार आहे. तसेच माजलगावच्या केसापुरी येथील केशवराज मंदिर आणि पाटोदा तालुक्यातील संगमेश्वर महादेव मंदिराच्या दुरुस्तीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या देखरेखीखाली ही सर्व कामे पुरातत्वीय निकष पाळून पूर्ण केली.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande