
बीड, 01 एप्रिल (हिं.स.)।
आद्य शंकराचार्यांचा सनातन धर्मासाठीचा उपदेश घरोघरी अभ्यासला जावा, असे मार्गदर्शन श्री श्री शंकर भारती महास्वामी यांनी आपल्या आशीर्वचनातून बीडकरांना केले. पराभवनाम संवत्सरात सुरू झालेला बीडचा रामोत्सव अविस्मरणीय झाल्याचे ते म्हणाले. शहरातील रविराज मंगल कार्यालयात नऊ दिवस चाललेल्या रामोत्सवाची सांगता झाली.
शंकर भारती महास्वामी म्हणाले, पुरातन चंपावती नगरीत शंकराचार्याचा चतुर्मासदेखील झालेला आहे. क्षेत्र तुळजापूर, पैठण, परळी वैजनाथ, नवगन राजुरीसह बीडमधील जटाशंकर कंकालेश्वर, खंडेश्वरी मंदिर अशा विविध ठिकाणी आद्य शंकराचार्यांचा प्रवास, वास्तव्य झालेली ठिकाणे, शहरातील राम मंदिरात स्थापित झालेल्या सीताराम आणि हनुमंत मूर्ती आहेत. बीड हे आस्तिक शहर असल्याचे त्यांनी नमूद केले. रामोत्सव यशस्वी करण्यासाठी राजकीय, सामाजिक, व्यापारी, लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्याचा उल्लेख आयोजन समितीने केला. विशेष म्हणजे रामोत्सवाची एक सक्रिय काम करणारी समिती होती. त्यात कोणीही नव्हते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis