नांदेड - लोहा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, शादीखाना प्रश्न मार्गी लागणार
नांदेड, 01 एप्रिल, (हिं.स.)। लोहा शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह व्हावे त्यासाठी शासकीय जागेची उपलब्ध तसेच मुस्लिम बांधवांच्या शादीखानाच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा यासाठी विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष आ. प्रताप पाटील चिखल
नांदेड - लोहा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, शादीखाना प्रश्न मार्गी लागणार


नांदेड, 01 एप्रिल, (हिं.स.)। लोहा शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह व्हावे त्यासाठी शासकीय जागेची उपलब्ध तसेच मुस्लिम बांधवांच्या शादीखानाच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा यासाठी विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचा पाठपुरावा सुरू आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे शहर विकासाच्या अनुषंगाने महत्वाच्या विषयावर बैठक झाली त्यात शहरातील महत्वाचे प्रश्न मार्गी लागणार आहे. जागेचा प्रश्न लवकरच निकाली निघेल असा विश्वास बैठकी नंतर आ. चिखलीकर यांनी व्यक्त केला.

विधिमंडळ उपविधीन समितीचे अध्यक्ष आ चिखलीकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले याच्याकडे बैठक पार पडली या बैठकीसाठी जि प. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, सहाय्यक जिल्हाधिकारी कंधार उपविभागीय अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, नगराध्यक्ष शरद पाटील पवार, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे लोहा उपनगराध्यक्ष करीम शेख, उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी (कंधार), सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता राम गलधर, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, मुख्याधिकारी संदीप भोळे, ( कंधार) महावितरणचे कार्यकारी अभियंता चव्हाण, लघु पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख, महावितरण, नगरपालिका संबधीत अधिकारी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लोहा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह उभारण्यात येणार बांधवांसाठी शादीखाना उभारण्यात येणार आहे त्याच्या जागेचा प्रश्न या बैठकीत निकाली काढण्यात आला.

माळेगाव यात्रा येथे सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी महावितरणचे ना हरकत तसेच श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान यात्रा परिसर विकास प्रसाद योजने अंतर्गत करण्यासाठी प्रस्ताव व शिफारसी शासनास पाठवणे य विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande