
अमरावती, 01 एप्रिल (हिं.स.)
सोमवारी रात्री उशिरा झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील गहू व उन्हाळी कांद्यासह संत्रा, केळी व लिंबू या फळपिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ५७८ हेक्टर क्षेत्रास या पावसाचा फटका बसला असून मार्चमधील हा दुसरा फटका आहे. सर्वाधिक नुकसान अंजनगावसुर्जी व चांदूर बाजार तालुक्यात झाले आहे. विशेषतः गहू, कांदा व संत्रा या फळपिकांचे नुकसान अधिक प्रमाणांत झाले आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीटही झाली. रब्बी हंगामातील गव्हाची काढणी बहुतांश ठिकाणी झाली असून विलंबाने पेरणी झालेला गहू काढणीच्या स्थितीतआहे. अंजनगावसुर्जी तालुक्यात ३५ गावांमधील १०६ हेक्टर चांदूर बाजार तालूक्यातील हेक्टर क्षेत्रातील गव्हाचे नुक झाले आहे. १५१ हेक्टर उन्हाळी कांद्याला फटका ब आहे. त्यामध्ये अंजनगावसुर्जीतालूक्यातील ९०, चांदूर बाजारमधील ४०, अचलपूरमधील १५ हेक्टरचा समावेश आहे.
संत्रा, लिंबू, आंबा, पपई या फळपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः चांदूर बाजार तालुक्यातील १३३ हेक्टरमधील संत्र्याला फटका बसला आहे. अंजनगावसुर्जी तालुक्यात २९ हेक्टरमधील लिंबू पिकाचे नुकसान झाले आहे. ६० हेक्टरमधील केळीचे नुकसान या पावसाने झाले आहे. नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यास लवकरच प्रांरभ करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांनी सांगितले.
जिल्ह्यातील नुकसान
पिक
हेक्टर
गहू
१६०
कादा
१५१
संत्रा
१३३
लिंबू
२९
केळी
६०
आंबा
२
पपई
१२
भाजीपाला
८
हरभरा
७
ज्वारी
४-------------
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी