
ठाणे , 10 एप्रिल (हिं.स.)। गेल्या १० दिवसांपासून मुंब्रा-कौसा भागात सुरू असलेला एसआरए शिबिर यशस्वी करण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला या मोहिमेशी जोडण्यासाठी, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या विनंतीनुसार मुंब्रा-कौसा येथे १० दिवसांचा अतिरिक्त कालावधी वाढवून आता २० एप्रिल पर्यंत करण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि पुढाकार
जनतेच्या सुविधेसाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शमीम अहमद खान, अशरफ शानू पठाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व नगरसेवकांमार्फत मुंब्रा ते कौसापर्यंत विविध ठिकाणी एसआरए शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रत्येक शिबिरात लोकांची वाढती गर्दी आणि बीएलओंची कमतरता यामुळे मुंब्रात आतापर्यंत सुमारे २ लाख लोक एसआरए मॅपिंग करण्यापासून वंचित राहिले आहेत. याच कारणास्तव मुंब्रा-कळवा अध्यक्ष शमीम अहमद खान यांनी ८ एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकारी, १४९ मुंब्रा-कलवा कार्यालयाला पत्र देऊन, एसआरए मॅपिंगसाठी अधिक वेळ वाढवून देण्यात यावा, जेणेकरून जनतेला याचा पूर्ण लाभ मिळेल आणि कोणताही मतदार यापासून वंचित राहणार नाही, असे म्हटले आहे.
शमीम अहमद खान यांच्या या मागणीचा विचार करून मुंब्रा-कलवा निवडणूक अधिकाऱ्यांनी १० दिवसांची अतिरिक्त मुदत वाढवून ती २० एप्रिलपर्यंत केली आहे. जनतेसाठी हा कालावधी वाढवून दिल्याबद्दल शमीम अहमद खान आणि अशरफ शानू पठाण यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संदीप थोरात यांचे आभार व्यक्त केले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर