महायुतीचा धर्म उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी तोडला – चंद्रशेखर बावनकुळे
अकोला, 10 एप्रिल (हिं.स.) : महायुतीचा धर्म उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी तोडला असल्याची तीव्र टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. श्री लक्षेश्वर संस्थान सभागृह, लाखपूरी (ता. मुर्तीजापूर) येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराज
Photo


अकोला, 10 एप्रिल (हिं.स.) : महायुतीचा धर्म उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी तोडला असल्याची तीव्र टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

श्री लक्षेश्वर संस्थान सभागृह, लाखपूरी (ता. मुर्तीजापूर) येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सख्या भावासारखे एकजुटीने काम करत असून सरकार विश्वासाने कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

“फोडाफोडीचे राजकारण आमच्या रक्तात नाही. आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत,” असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात निर्माण झालेल्या अविश्वासामुळेच त्यांचे आमदार पक्ष सोडून गेले, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

आमदार आणि खासदार कोणालाही भेटणे हे राजकीय नसून मतदारसंघातील विकासकामांसाठी असते, असे स्पष्ट करत त्यांनी अशा भेटींवर संशय घेणे चुकीचे असल्याचेही सांगितले. महायुती सरकार मजबूत असून एकदिलाने काम करत असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande