मूर्तिजापूर–भातकुली महामार्गावर भीषण अपघात
अकोला, 10 एप्रिल (हिं.स.)।अकोल्यातील मूर्तिजापूर–भातकुली राज्य महामार्गावर हिरपूर जवळ एक भीषण दुचाकी अपघात घडला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मूर्तिजापूर ते भातकुली हा राज्य महामार्ग सध्या निर्माण
Photo


अकोला, 10 एप्रिल (हिं.स.)।अकोल्यातील मूर्तिजापूर–भातकुली राज्य महामार्गावर हिरपूर जवळ एक भीषण दुचाकी अपघात घडला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

मूर्तिजापूर ते भातकुली हा राज्य महामार्ग सध्या निर्माणाधीन अवस्थेत असून, अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. अशाच परिस्थितीत हिरपूर जवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.या भीषण अपघातात गोपाल तुकाराम लिंगे (वय ५०, रा. पारवा, ता. कारंजा) आणि चेतन रमेश ताटके (वय २६, रा. चिखली, ता. मूर्तिजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला.तर केसर गोपाल लिंगे (वय ४२, रा. पारवा, ता. कारंजा) या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्तांनी हेल्मेटचा वापर केला असता तर कदाचित जीवितहानी टाळता आली असती.

“दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा हेल्मेटमुळे जीव वाचू शकतो.”

दरम्यान, या महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अपूर्ण काम आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडून यावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande