
कोल्हापूर, 10 एप्रिल (हिं.स.) : कोल्हापूर महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 3 (राजारामपुरी) आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने आज के.एस.बी.पी. पार्क परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान 2 लोखंडी अँगल, 1 टेबल, 2 हातगाड्या, 4 काउंटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच 19 हातगाडीधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेतले.
सोमवारी झालेल्या जनता दरबारात या भागातील अतिक्रमणाबाबत तक्रार दाखल झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तसेच महापौरांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. या वेळी 1 जेसीबी, 2 ट्रॅक्टर-ट्रॉली आणि 1 डंपरचा वापर करण्यात आला.
ही मोहीम रूपराणी निकम यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि शहर अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की शहरातील अनधिकृत फेरीवाले आणि रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या अनधिकृत शेड्सवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार आणि फेरीवाल्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar