
बीड, 10 एप्रिल (हिं.स.)।बीड जिल्ह्यात नाफेडमार्फत सुरू असलेल्या हमीभाव खरेदी प्रक्रियेत हरभऱ्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असताना तुरीची खरेदी मात्र थंडावल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ९०७ शेतकऱ्यांकडून ९५ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी पूर्ण झाली असून, त्याची किंमत ५६ कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये आनंदवाडी केंद्रावर सर्वाधिक खरेदी झाली आहे. दुसरीकडे, तुरीला ८ हजार रुपये हमीभाव असूनही खुल्या बाजारात जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात ७९९ शेतकऱ्यांनी तुरीसाठी नोंदणी केली होती, मात्र केवळ ९४ शेतकऱ्यांनीच आपला माल नाफेडला विकला आहे. खुल्या बाजारातील तेजीमुळे शासकीय खरेदी केंद्रांवरील तुरीचे आकडे घटले असून, हरभऱ्याची खरेदी मात्र वेगात सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis