परळी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू
बीड, 10 एप्रिल (हिं.स) परळी शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणे मोकळी करण्याच्या उद्देशाने येथील नगर परिषदेने मंगळवारपासून पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दुकानासमोरील फलके, लोखंडी अँगलचे साहित्य, रस्त्यावर
परळी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू


बीड, 10 एप्रिल (हिं.स)

परळी शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणे मोकळी करण्याच्या उद्देशाने येथील नगर परिषदेने मंगळवारपासून पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दुकानासमोरील फलके, लोखंडी अँगलचे साहित्य, रस्त्यावरील अतिक्रमित साहित्य दहा ट्रॅक्टरमध्ये भरून हटविले.

उपमुख्याधिकारी संतोष रोडे व इतर दहा अधिकारी, २० कामगार व दोन पोलिस अधिकारी, संभाजीनगरचे पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे, सहाय्यक पोलिस

निरीक्षक अनिल शिंदे व २० पोलिस कर्मचारी उपस्थित होते. ही कारवाई सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठीच आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढावे आणि परळी शहर स्वच्छ, सुंदर व आदर्श बनविण्यास हातभार लावावा, असे आवाहन उपमुख्य अधिकारी संतोष रोडे यांनी केले आहे. आणखी चार दिवस शहरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शांततेत अतिक्रमण हटाव मोहीम चालू असल्याची माहिती संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पो. नि. धनंजय ढोणे यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande