
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल (हिं.स.)। उत्तर ग्रामीण जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर यांनी जाहीर केली. फुलंब्री, सिल्लोड व पैठण या तीन विधानसभा मतदारसंघांतील निष्ठावान महिला कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.
या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सरसा वाघ, वंदना पाटील, संगीता पांडव, वालंबा पवार, भारती देशपांडे, मीराबाई चव्हाण व सुलोचना साळुंके यांची निवड झाली आहे. सरचिटणीसपदी वृषाली मिरकर, जानकी काळे, नम्रता पटेल व मंगला आस्वार यांची नियुक्ती
करण्यात आली. चिटणीसपदी रत्ना सोनवणे, मनीषा शिंदे, आशा कुबेर, मुक्ता पाथ्रे, नीता मुळे, सीमा उबाळे व अॅड. रोहिणी शिंदे यांची निवड झाली आहे. तसेच कोषाध्यक्षपदी गंगा ताठे तर सोशल मीडिया प्रमुखपदी अश्विनी ढोके यांची निवड झाली. पाचही तालुक्यांतील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ही सर्वसमावेशक कार्यकारिणी तयार केल्याचे गाडेकर यांनी यावेळी सांगितले.
महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार प्रशांत बंब, आमदार संजय केणेकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis