नांदेड - भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य देशमुख परभणीचे प्रभारी
नांदेड, 10 एप्रिल, (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापु देशमुख यांच्या खांद्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोठी जबाबदारी टाकली असून त्यांच्याकडे परभणी जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
नांदेड - भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य देशमुख परभणीचे प्रभारी


नांदेड, 10 एप्रिल, (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापु देशमुख यांच्या खांद्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोठी जबाबदारी टाकली असून त्यांच्याकडे परभणी जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. चैतन्य बापु देशमुख यांच्या रुपाने परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. दरम्यान दुसरे प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथील प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

नांदेड येथील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापु देशमुख व संजय कौडगे यांच्यावर पक्षाने मोठा विश्वास व्यक्त काम करण्यासाठी मोठे मैदान उपलब्ध करून दिले आहे. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत संघटन सरचिटणीस शरद भाऊ कुलकर्णी यांच्या तालमीत ते वाढले आहेत. त्यामुळे संघटनात्मक जबाबदारी यशस्वी पार पाडतील व परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद

वाढविण्यासाठी त्यांचे संघटन कौशल्य कामाला येईल. भारतीय जनता पक्षाने 'मिशन २०२९'ची सुरवात केली आहे.

भारतीय जनता पक्षाने आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ७४ संघटनात्मक जिल्ह्यांच्या जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये परभणी जिल्ह्याची संपूर्ण धुरा प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, चैतन्यबापूंकडे केवळ परभणी शहरच नव्हे, तर ग्रामीण अशा दोन्ही संघटनात्मक जिल्ह्यांचे प्रभारी पद देऊन पक्षाने त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे.

मराठवाडा संघटनमंत्री म्हणून काम पाहिलेल्या संजय कौडगे यांची नुकतीच प्रदेश उपाध्यक्षपदी बढती झाली होती. त्यांना आता छत्रपती संभाजीनगर शहर, उत्तर आणि दक्षिण या तीनही जिल्ह्यांची जवाबदारी देऊन संघटनात्मक बांधणी करण्याचे दायित्व दिले आहे. भारतीय जनता पक्षाने नुसती नियुक्ती करून प्रदेशाध्यक्ष थांबलेले नाहीत, तर त्यांनी नवनियुक्त प्रभारींना कामाची डेडलाईनही दिली आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande