नांदेड - विधीमंडळ अंदाज समितीच्या आढावा बैठकीतही प्रश्नांचा भडीमार
नांदेड, 10 एप्रिल (हिं.स.)। नांदेड विधानमंडळ अंदाज समितीच्या आढावा बैठकीमध्ये प्रश्नांचा भडीमार करण्यात आला आहे. विविध विभागांच्या विभागप्रमुखांनी प्रशासकीय तयारी केली, परंतू करण्यात आलेल्या तक्रारीवरच समितीने प्रश्न उपस्थित करून आढावा घेतला. काह
अ


नांदेड, 10 एप्रिल (हिं.स.)।

नांदेड विधानमंडळ अंदाज समितीच्या आढावा बैठकीमध्ये प्रश्नांचा भडीमार करण्यात आला आहे. विविध विभागांच्या विभागप्रमुखांनी प्रशासकीय तयारी केली, परंतू करण्यात आलेल्या तक्रारीवरच समितीने प्रश्न उपस्थित करून आढावा घेतला. काही अधिकाऱ्यांनी प्रशासनाची बाजूठासून सांगितली तर काही अधिकाऱ्यांची माहिती देताना दमछाक झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठकीला समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर व जिल्हाधिकारी राहुलकर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरूवात झाली. या बैठकीमध्ये विविध विभागामार्फत करण्यात आलेली विकासकामे व निधीखर्च

याचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील विविध विभागाचे विभागप्रमुख व अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीमध्ये सादरीकरण केले.

विधानमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आ. अर्जुन खोतकर व समितीकडे शहरासह जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारी केल्या आहेत. काहीजणांनी अध्यक्षाकडे अधिकाऱ्यांच्या तोंडी तक्रारी मांडल्या आहेत. परंतू या तक्रारीत कितपत तथ्य आहे की केवळ आरोप आहे, ही सत्यता अंदाज समितीला पडताळणी करावी लागणार आहे.

दरम्यान समितीने मनपाच्या घनकचरा प्रकल्प व भोकर तालुक्यातील चिकाळा गावात आणि नायगाव तालुक्याल देखील भेट दिली आहे.

समितीचा दौरा संपल्यानंतर या दौऱ्यातील आढावा बैठकीचे फलीत काय निघणार आहे? हे येणाऱ्या काळात कळेल.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande