बीड जिल्ह्यातील ४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पदोन्नती
बीड, 10 एप्रिल (हिं.स.)।महाराष्ट्र पोलीस दलातील प्रलंबित पदोन्नती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला असून बीड जिल्ह्यातील ४ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली आहे. राज्य पोलीस महासंचालकांनी यासंदर्भातील २५ अधिकाऱ्यांची यादी जाही
बीड जिल्ह्यातील ४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पदोन्नती


बीड, 10 एप्रिल (हिं.स.)।महाराष्ट्र पोलीस दलातील प्रलंबित पदोन्नती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला असून बीड जिल्ह्यातील ४ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली आहे. राज्य पोलीस महासंचालकांनी यासंदर्भातील २५ अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. पदोन्नती मिळालेल्यांमध्ये बीड वाहतूक शाखेचे सुभाष सानप (नाशिक ग्रामीण), गोविंद पांडव (संभाजीनगर लोहमार्ग), गणेश घोळट (जालना पोलीस प्रशिक्षण केंद्र) आणि नारायण एकशिंगे (मुंबई शहर) यांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही प्रक्रिया गृहविभागाकडे प्रलंबित होती. या पदोन्नतीमुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून अधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande