एसटी वाहकास मारहाण करणाऱ्या आरोपीला सहा महिने कारावासाची शिक्षा
बीड, 10 एप्रिल (हिं.स.)। केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एसटी बसच्या वाहकास मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी याला सहा महिने कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ३० जून २०२२ रोजी मसाजोग येथील ब
एसटी वाहकास मारहाण करणाऱ्या आरोपीला सहा महिने कारावासाची शिक्षा


बीड, 10 एप्रिल (हिं.स.)। केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एसटी बसच्या वाहकास मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी याला सहा महिने कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ३० जून २०२२ रोजी मसाजोग येथील बस थांब्यावर घडली होती, जेव्हा जालना आगाराची बस प्रवाशांची चढ-उतार करत असताना बस थांबवण्याच्या कारणावरून आरोपीने वाहक नितीनकुमार प्रल्हादराव तायडे यांना मारहाण केली होती. न्यायाधीश श्रीमती आर. के. शेख यांच्यासमोर या प्रकरणाची अंतिम सुनावणी पार पडली. प्रत्यक्षदर्शी प्रवासी रमेश महामुनी यांच्यासह पाच साक्षीदारांच्या साक्षी आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने हा निकाल दिला आहे. तत्कालीन फौजदार राजेश पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले होते, तर सरकारी पक्षातर्फे वकील राम बिरंगळ यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande