गोवर्धन येथे भुजबळ विज्ञान व वाणिज्य विद्यालय सुरु
नाशिक, 10 एप्रिल (हिं.स.)। मुंबई शैक्षणिक ट्रस्ट, भुजबळ ज्ञाननगरी, आडगाव, नाशिक या संस्थेतर्फे गोवर्धन, गंगापूर येथे भुजबळ विज्ञान व वाणिज्य विद्यालयाची सुरुवात झाली आहे. संपूर्ण नाशिककरांसाठी तसेच संपूर्ण महाराष्ट्रासाठी यापूर्वीच गोवर्धन, नाशिक
Bhujbal Science and Commerce


नाशिक, 10 एप्रिल (हिं.स.)।

मुंबई शैक्षणिक ट्रस्ट, भुजबळ ज्ञाननगरी, आडगाव, नाशिक या संस्थेतर्फे गोवर्धन, गंगापूर येथे भुजबळ विज्ञान व वाणिज्य विद्यालयाची सुरुवात झाली आहे. संपूर्ण नाशिककरांसाठी तसेच संपूर्ण महाराष्ट्रासाठी यापूर्वीच गोवर्धन, नाशिक येथे वास्तुकला व अंतर्गत रचना विद्यालय सुरु असून विद्यार्थी नैसर्गिक वातावरणात शिक्षण घेत आहेत.अकरावी, बारावी विज्ञान व वाणिज्य शाखेचे वर्ग सुरु झाल्याने भुजबळ विज्ञान व वाणिज्य विद्यालय या संस्थेला उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची संलग्न मान्यता मिळाली असून सर्व प्रवेश परीक्षा प्रशिक्षण एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होईल या उद्देशाने या विद्यालयाची सुरुवात गोवर्धन येथे करण्यात आली. एकाच ठिकाणी सर्व प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन व मूलभूत अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळण्यासाठी सर्व नाशिककरांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संख्याचालकांकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande