नांदेड - मनपा शाळांमधील सुविधांची शिक्षण समिती सभापतींकडून अचानक पाहणी
नांदेड, 10 एप्रिल (हिं.स.)। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण तसेच शिक्षण समितीच्या सभापती सौ. सदिच्छा सोनी- पाटील यांनी शहरातील मनपाच्या पाच शाळांना अचानक भेटी देत तेथील भौतिक व शैक्षणिक सुविधांची सखोल पाहणी केली. या अचानक भेटींम
नांदेड - मनपा शाळांमधील सुविधांची शिक्षण समिती सभापतींकडून अचानक पाहणी


नांदेड, 10 एप्रिल (हिं.स.)।

नांदेड वाघाळा

महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण तसेच शिक्षण समितीच्या सभापती सौ. सदिच्छा सोनी- पाटील यांनी शहरातील मनपाच्या पाच शाळांना अचानक भेटी देत तेथील भौतिक व शैक्षणिक सुविधांची सखोल पाहणी केली. या अचानक भेटींमुळे शाळांमधील प्रत्यक्ष परिस्थितीचा व अडचणींचा आढावा घेण्यास मदत झाली.

मनपा शाळा गणेशनगर, लेबर कॉलनी, आंबेडकर नगर, भीम संदेश आणि जंगमवाडी येथील शाळांमध्ये त्यांनी भेट दिली. पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची उपस्थिती, वर्गखोल्यांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शौचालयांची स्थिती, मुलींच्या स्वच्छतागृहाची व्यवस्था, मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता यांचाबारकाईने आढावा घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणारे शालेय साहित्य, बसण्याची व्यवस्था, वाचनालय सुविधा, खेळाचे साहित्य आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, पोषण आहार याबाबतही माहिती घेण्यात आली. या भेटीदरम्यान काही शाळांमध्ये भौतिक सुविधांची आवश्यक दुरुस्ती, स्वच्छतेतील त्रुटी, शिक्षकांची संख्या पुरेशी नसणे आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले. यावर तत्काळ

उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. सभापती सौ. पाटील यांनी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन देत, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही मनपाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande