पुणे - चाैकशीत दाेषी आढळल्यास मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार
पुणे, 10 एप्रिल (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी बाेगस उपसूचनांद्वारे तरतुदींमध्ये वाढ-घट करून ५२ काेटी रुपयांची ठेकेदारांना अदा केलेली देयके बँकेला सांगून राेखली आहेत. ठेकेदारांच्या खात्यावर पैसे गेले नाहीत. या
पुणे - चाैकशीत दाेषी आढळल्यास मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार


पुणे, 10 एप्रिल (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी बाेगस उपसूचनांद्वारे तरतुदींमध्ये वाढ-घट करून ५२ काेटी रुपयांची ठेकेदारांना अदा केलेली देयके बँकेला सांगून राेखली आहेत. ठेकेदारांच्या खात्यावर पैसे गेले नाहीत. या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमली आहे. समिती सात दिवसात अहवाल देणार आहे. चाैकशीत दाेषी आढळल्यास मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

आर्थिक वर्षाच्या (२०२५-२६) ३० आणि ३१ मार्च या दाेन दिवसांमध्ये लेखा व वित्त विभागाने बोगस उपसूचनांद्वारे तरतुदींमध्ये वाढ-घट करून ५२ काेटींची देयके दिल्याचा प्रकार स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी उघडकीस आणला. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ‘मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी नगरसचिव कार्यालयाकडून उपसूचना प्राप्त करून घेणे आवश्यक हाेते. नगरसचिव कार्यालयात उपसूचनांची नाेंद नाही. जैन यांनी माझ्याशी काेणतीही चर्चा केली नाही. त्यांचे दुसरे काेण वरिष्ठ अधिकारी असतील, तर मला माहिती नाही. ठेकेदाराला अदा केलेली देयकांची रक्कम राेखण्यात आली आहे. बँकेला त्याबाबत सूचना दिल्या आहेत, असे मला जैन यांनी सांगितले.’

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande