लातूर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लकी यांनी घेतली दिलीपराव देशमुख यांची भेट
लातूर, 10 एप्रिल (हिं.स.)। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ऑब्झर्वर तथा चंदीगड कोंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हरमोइंदरसिंग लकी प्रदेश निरीक्षक राजदीप सिद्धू, प्रदेश निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांनी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी काँग्रेसचे जेष्ठ नेते दिल
दिलीपराव देशमुख


लातूर, 10 एप्रिल (हिं.स.)।

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ऑब्झर्वर तथा चंदीगड कोंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हरमोइंदरसिंग लकी प्रदेश निरीक्षक राजदीप सिद्धू, प्रदेश निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांनी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी काँग्रेसचे जेष्ठ नेते दिलीपराव देशमुख साहेब यांच्या आशियाना निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते ए आय सी सी चे ऑब्झर्वर तथा चंदिगडचे प्रदेशाध्यक्ष हरमोईवदरसिंग लकी प्रदेश निरीक्षक राजदीप सिद्धू बाळासाहेब देशमुख यांचा देशमुख परिवाराच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

आशियाना निवासस्थानी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ऑब्झरव 'हरमोइंदरसिंग यांनी आखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन

खरगे काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार सोनिया गांधी यांनी यांच्या सुचेनुसार देशभरात काँग्रेस संघटन कार्य पक्षाचा विचार वाढवण्यासाठी पक्ष देशभरात

सर्वत्र पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठका घेत आहे त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रात जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे यामुळे जिल्ह्यातील विविध सेलचे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते

यां ना संघटनेत काम करण्याची संधी मिळणार आहे असे यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड किरण जाधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande