कल्याण-डोंबिवलीत पक्ष मजबुतीसाठी काँग्रेसची आगेकूच
- नवीन पदे भरण्यास सुरुवात डोंबिवली, 10 एप्रिल (हिं.स.)। काँग्रेस पक्षाने केडीएमसीत तब्बल अडीच वर्षे उप महापौरपद मिळवलं होते. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांत काँग्रेस सत्तेत सहभागी झाली नाही. कल्याण - डोंबिवलीत अनेक वर्षांपासून भाजपा - शिवसेनेची सत्
Photo1


- नवीन पदे भरण्यास सुरुवात

डोंबिवली, 10 एप्रिल (हिं.स.)।

काँग्रेस पक्षाने केडीएमसीत तब्बल अडीच वर्षे उप महापौरपद मिळवलं होते. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांत काँग्रेस सत्तेत सहभागी झाली नाही. कल्याण - डोंबिवलीत अनेक वर्षांपासून भाजपा - शिवसेनेची सत्ता असल्याने काँग्रेसला वीसच्या पुढे आपले लोकप्रतिनिधी निवडून आणता आले नाहीत. यातील तीन माजी नगरसेवकांनी भाजपात तर एका नगरसेवकाने शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. या निवडणुकीत काँग्रेसला दोन नगरसेवकावरच समाधान मानावे लागले. आपला पक्ष बळकट करावा असे कार्यकर्त्यांना वाटलं असलं तरी पक्षश्रेष्ठींना कल्याण-डोंबिवलीत लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. आता काँग्रेसने पक्ष मजबुतीकरण करण्यास सुरुवात केली असून कल्याण जिल्हा अध्यक्ष व डोंबिवली जिल्हा अध्यक्ष अशी वेगवेगळी पदे करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता कल्याण व डोंबिवलीत संघटन सृजन अभियान सुरु करण्यात आले.

भाजपाचा बाल्लेकिल्ला समजल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरात आणि शिवसेनेचा गड मानले जाणाऱ्या कल्याण शहरात काँग्रेस जम बसविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून पदांकरता इच्छुकांची नावे घेण्यात आली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नियुक्त निरीक्षक डॉ. पलक वर्मा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निरीक्षक तुकाराम रेगे- पाटील, राणी अग्रवाल, शहा आलम यांनी भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते मामा पगारे यांसह प्रभारी जिल्हाअध्यक्ष राजाभाऊ पाटकर, ऍड. नवीन सिंग, अशोक कापडणे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डोंबिवलीतील अस्तित्व शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या संघटन सृजन अभियान उपस्थित काँग्रेस निरीक्षकांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नियुक्त निरीक्षक डॉ. पलक वर्मा म्हणाल्या, काँग्रेस मजबुतीकरणावर भर देत असून महाराष्ट्रात काँग्रेस नक्कीच वर येईल. भाजपाच्या राजकीय खेळीला काँग्रेस उत्तर देईल. कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसची मोठी पदे भरण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande