रत्नागिरी : नागरी संरक्षण दलाचे मॉक ड्रिल यशस्वी
रत्नागिरी, 10 एप्रिल, (हिं. स.) : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातंर्गत येणाऱ्या नागरी संरक्षण दलातर्फे आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी युद्धजन्य परिस्थितीला अनुसरून काल, दि. 9 एप्रिल रोजी रात्री मॉकड्रिल आणि ब्लॅक आऊट एक्सरसाइज फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिम
रत्नागिरी : नागरी संरक्षण दलाचे मॉक ड्रिल यशस्वी


रत्नागिरी, 10 एप्रिल, (हिं. स.) : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातंर्गत येणाऱ्या नागरी संरक्षण दलातर्फे आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी युद्धजन्य परिस्थितीला अनुसरून काल, दि. 9 एप्रिल रोजी रात्री मॉकड्रिल आणि ब्लॅक आऊट एक्सरसाइज फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड रनपार येथे घेण्यात आली.

शत्रूच्या ड्रोनद्वारे औद्योगिक स्थळांवर झालेला हल्ला व त्यामुळे देशाची उत्पादनक्षमता व अर्थव्यवस्था यांना होणारे नुकसान अशी पार्श्वभूमी ठेवून नागरी संरक्षण दल स्वयंसेवक, गृह रक्षक दल, एनसीसी कॅडेट्स, तटरक्षक दल, जिल्हा पोलीस, अग्निशमन दल आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे अग्नि विमोचक व सुरक्षा बल यांनी मिळून संयुक्त सराव केला.

रात्री ८ वाजण्याच्या सुमारास फिनोलेक्स रेसिडेंट एरिया व स्टाफ क्वॉटर्स येथे शत्रूच्या क्षेपणास्त्रांनी मनुष्य वसाहतीवर होणारी हानी या संकल्पनेवर ब्लॅक आऊट एक्साइजचा सराव करण्यात आला. त्यामध्ये जखमी लोकांना सुरक्षित बाहेर काढणे, त्यांना प्रथमोपचार देऊन नजीकच्या दवाखान्यामध्ये पाठवणे. लागलेली आग विझवणे आणि मालमत्तेचे नुकसान टाळणे या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला.या कवायतींमध्ये सामान्य नागरिकांनाही सामील करून घेऊन त्यांना भविष्यामध्ये अशा प्रसंगांना कशा पद्धतीने सामोरे जावे याचेही प्रशिक्षण देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande