सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी संपन्न
सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.)। मोडनिंब (ता. माढा) येथे मध्यरात्री एकच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर पुतळा उभारणीनंतर रात्री दीडच्या सुमारास आतषबाजी करण्यात आली. अनेक दिवसा
dfgsd


सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.)। मोडनिंब (ता. माढा) येथे मध्यरात्री एकच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर पुतळा उभारणीनंतर रात्री दीडच्या सुमारास आतषबाजी करण्यात आली. अनेक दिवसांपासून मोडनिंब शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची कुणकुण पोलिसांना होतीच. पुतळा उभारणीनंतर तासाभरातच करमाळ्याच्या पोलिस उप अधीक्षक अंजना कृष्णा, पंढरपूरचे सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे, टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम, कुर्डुवाडीचे पोलिस निरीक्षक अतुल मोहिते, टेंभुर्णीचे सहायक पोलिस निरीक्षक रोहिदास पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत मदने यांनी घटनास्थळी भेट दिली. पहाटेपासूनच दंगल नियंत्रण पथक व क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास भीमसैनिक, सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. मागील महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. त्यानंतर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा याच परिसरात उभारण्यात आला आहे. दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांच्या स्वागतासाठी शहरवासी व सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती.

--------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande