आयटी कंपनीतील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी, ऑपरेशन मॅनेजरला पोलीस कोठडी
दुसऱ्या गुन्ह्यात शनिवारी पुन्हा होणार अटक नाशिक, 10 एप्रिल (हिं.स.)। - मल्टिनॅशनल आयटी कंपनीमध्ये महिलांच्या लैंगिक अत्याचाराबाबत असलेल्या पाच आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर ऑपरेशन मॅनेजर असलेल्या एका महिलेला 13 तारखेपर्यंत
आयटी कंपनीतील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी, ऑपरेशन मॅनेजरला पोलीस कोठडी


दुसऱ्या गुन्ह्यात शनिवारी पुन्हा होणार अटक

नाशिक, 10 एप्रिल (हिं.स.)।

- मल्टिनॅशनल आयटी कंपनीमध्ये महिलांच्या लैंगिक अत्याचाराबाबत असलेल्या पाच आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर ऑपरेशन मॅनेजर असलेल्या एका महिलेला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे दरम्यान पोलीस दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये या आरोपींना उद्या शनिवारी अटक करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक मधील टाटा उद्योग समूहाच्या टीसीएस या आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम समाजाच्या अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांनी एकत्र संगनमत करून या ठिकाणी हिंदू धर्मातील आर्थिक अडचणीत असलेल्या तसेच काही महिलांना आणि मुलींना हेरुन त्यांना विविध ठिकाणी पार्टीला घेऊन जाणे त्या ठिकाणी त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करणे तसेच आर्थिक छळवणूक करणे याबरोबरच नको त्या मार्गाचा वापर त्यांच्यावर करण्यात आला या महिला व मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यासंदर्भामध्ये बळजबरी करण्यात येत होती. हा प्रकार मागील चार वर्षापासून सुरू होता पण यातील एका महिलेने पुढे येऊन अतिशय हिमतीने नाशिक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आणि त्यानंतर या प्रकरणाला खरी वाचा फुटली. एका मागवा मग एकूण नऊ तक्रारी दाखल झाल्या या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांवरती गुन्हा नोंदवला होता.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी तौसीफ अत्तर, रजा मेमन, शाहरुख कुरैशी, शफी शेख और आसिफ अंसारी या आरोपींना अटक केलेली होती. या आरोपींना न्यायालयाने आज शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी दिली होती ती कोठडी संपल्यानंतर त्यांना आज न्यायमूर्ती आर.सी. नरवाडिया यांच्या न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर या सर्व प्रकरणांमध्ये फरार झालेली आणि ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करणारी पुण्याची अश्विनी चेनानी हिलाही न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे त्यामुळे अश्विनीच्या जबाब मध्ये अजून काही माहिती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान नाशिक पोलिसांकडे नऊ गुन्हे दाखल आहेत त्यामुळे दुसऱ्या गुन्ह्याचा तपासामध्ये न्यायालयीन कोठडीत गेलेल्या पाच आरोपींना पुन्हा शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande