
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात अंतर्गत गटबाजीमुळे सपाटून मार खाव्या लागलेल्या शिवसेनेने संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या विविध विभागांच्या कामांचा आढावा घेणे सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून खासदार श्रीकांत शिंदे रविवारी शहरात येत असून, पदाधिकारांच्या बैठकीत ते पक्षातील गटतटांची हजेरी घेणार असल्याचे समजते
शिवसेनेचा बालेकिल्ला अशी आतापर्यंत ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याला भाजपने भगदाड पाडत महापालिका आणि जिल्हा परिषद ताब्यात घेतली. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अवघ्या १२ जागा जिंकता आल्या.
पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचे तीन गट मुळे पक्षाला जबर हादरा बसला. पाठोपाठ जिल्हा परिषदेतही शिवसेनेला हादरा बसला. ६३ जागांपैकी भाजपने २३ जागा जिंकल्या तरी त्यांनी २२ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सत्तेच्या दाराबाहेर ठेवत सगळी पदे ताब्यात घेतली. या साऱ्या प्रकाराला आमदार विलास भुमरे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा आहे
तालुकानिहाय बैठक पार पडल्यानंतर रविवारी खासदार श्रीकांत शिंदे शहरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis