बीड शहर पोलिसांतर्फे मोफत आरोग्य शिबिर; ७२ नागरिकांनी घेतला लाभ
बीड, 10 एप्रिल (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बीड शहर पोलिस ठाण्याच्या वतीने मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलिस आणि नागरिक यांच्यातील जवळीक वाढावी व सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे, हा या उपक्रमाचा मुख्य
बीड शहर पोलिसांतर्फे मोफत आरोग्य शिबिर; ७२ नागरिकांनी घेतला लाभ


बीड, 10 एप्रिल (हिं.स.)।

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बीड शहर पोलिस ठाण्याच्या वतीने मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलिस आणि नागरिक यांच्यातील जवळीक वाढावी व सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. शिबिरात ७२ गरजूंनी मोफत तपासणी व औषधांचा लाभ घेतला.

बीड शहर पोलिस ठाण्याच्या वतीने मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी डॉ. सुनील बोबडे यांनी व्यायामाचे महत्त्व सांगितले, तर डॉ. प्रमोद शिंदे यांनी मोबाइलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या मानेच्या त्रासावर मार्गदर्शन केले. डॉ. विशाल पिंगळकर यांनी पाठीच्या आजारांवर वेळेत उपचार घेण्याचा सल्ला दिला.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande