पत्रकारितेचे तंत्रशुद्ध शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी; मुंबई विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरू
रायगड, 10 एप्रिल (हिं.स.)। : पत्रकारितेत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत (GICED) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. “पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मीडिया
Golden-opportunity-to-get-a-te


रायगड, 10 एप्रिल (हिं.स.)। : पत्रकारितेत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत (GICED) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. “पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मीडिया मॅनेजमेंट (मराठी)” हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम गेल्या २७ वर्षांपासून यशस्वीपणे चालविला जात आहे.

या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेची पदवी असलेले विद्यार्थी पात्र असून, वर्ग शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी घेतले जातात. त्यामुळे नोकरी करणाऱ्या तसेच पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. मराठी भाषेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रातील आधुनिक व तंत्रशुद्ध शिक्षण या अभ्यासक्रमातून दिले जाते.

मुद्रित, दृक-श्राव्य आणि वेब माध्यमांमध्ये वार्ताहर, उपसंपादक, संपादक, वृत्तनिवेदक, कंटेंट रायटर, ब्लॉग रायटर, जनसंपर्क अधिकारी, इव्हेंट मॅनेजर अशा विविध करिअरच्या संधी या अभ्यासक्रमातून उपलब्ध होतात. माध्यम क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ पत्रकारांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच इंटर्नशिप आणि नोकरीसाठी सहाय्य ही या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये आहेत.

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे केली जाणार असून, ही परीक्षा शनिवार, १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता गरवारे संस्थेत होणार आहे. परीक्षेत ५० गुणांची लेखी चाचणी असून बहुपर्यायी आणि लेखी प्रश्नांचा समावेश असेल. त्यानंतर त्याच दिवशी मुलाखती घेण्यात येतील.

इच्छुक विद्यार्थ्यांनी https://enrollonline.co.in/Registration/Apply/GICED या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वर्ग समन्वयक नम्रता कडू (७९७७४८९०७६) यांच्याशी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande