अमरावतीत ‘गोमाता रक्ततुला’ अभियानाचे आयोजन
अमरावती, 10 एप्रिल (हिं.स.) : गायींचे संरक्षण व संवर्धन व्हावे या उद्देशाने ‘गोमाता सन्मान अभियान समिती’च्या वतीने अमरावतीत आगळ्यावेगळ्या ‘गोमाता रक्ततुला’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (ता. १९) गोरक्षण संस्था, श्रीहव्याप्रमंजवळ य
अमरावतीत गोमाता रक्ततुला अभियान गोमाता सन्मान अभियान समितीचा पुढाकार


अमरावती, 10 एप्रिल (हिं.स.) : गायींचे संरक्षण व संवर्धन व्हावे या उद्देशाने ‘गोमाता सन्मान अभियान समिती’च्या वतीने अमरावतीत आगळ्यावेगळ्या ‘गोमाता रक्ततुला’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (ता. १९) गोरक्षण संस्था, श्रीहव्याप्रमंजवळ येथे सायंकाळी सहा वाजता हा विशेष समारंभ पार पडणार आहे.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ११ ते १९ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत १२ एप्रिल रोजी माहेश्वरी भवन येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या अभियानाबाबत माहिती देताना संयोजक रमेश (पप्पू) छांगाणी यांनी सांगितले की, अशा प्रकारचे आयोजन देशातच नव्हे तर जगात प्रथमच होत आहे. यासंदर्भात गुरुवारी श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली.

कार्यक्रमांच्या मालिकेत १३ एप्रिल रोजी महाआरती व प्रसाद वितरण, १४ एप्रिल रोजी सुंदरकांड पाठ, १५ एप्रिल रोजी गो-चारा अर्पण, १६ एप्रिल रोजी गजानन महाराज मंदिरात सामूहिक बावणी पाठ, तसेच १७ एप्रिल रोजी वृद्धाश्रमात भोजनदान असे विविध उपक्रम होणार आहेत.

१८ व १९ एप्रिल रोजी शोभायात्रा व मुख्य ‘गोमाता रक्ततुला’ समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ एप्रिल रोजी परशुराम व गोमाता यांची शोभायात्रा राधाकृष्ण मंदिर येथून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून गोरक्षण संस्थेत समारोप होणार आहे.

या समारंभासाठी अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे मठाधीपती जितेंद्रनाथ महाराज तसेच राजराजेश्वर माउली यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

गोरक्षण व गोसंवर्धनाला पाठबळ देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande