
लातूर, 10 एप्रिल (हिं.स.)।लातूर जिल्ह्यातील होतकरू गोविंद दरेकर यांची पोलीस उपनिरीक्षक (P.S.I.) पदावर निवड झाल्याची आनंदाची बातमी समोर आली असून परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गोविंद दरेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे पाठबळ आणि मित्रांच्या सहकार्याला दिले आहे. त्यांनी पुढील काळात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत समाजसेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
त्यांच्या या यशामुळे इतर तरुणांनाही प्रेरणा मिळत असून, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis