
नाशिक, 10 एप्रिल (हिं.स.)।
शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम २०२६ संदर्भात शिवसेना नाशिक लोकसभा मतदार संघाच्या प्रमुख पदाधिका-यांच्या बैठकीत विधानसभानिहाय मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी बूथ स्तरावर काटेकोर नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पाथर्डी फाटा येथे झालेल्या या बैठकीस शिवसेना नाशिक लोकसभेचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख आ. सुहास कांदे, शिवसेना उपनेते विजय करंजकर, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, अनिल ढिकले, माजी आ. काशिनाथ मेंगाळ, नितीन भोसले, सहसंपर्कप्रमुख गणेश कदम, उपमहापौर विलास शिंदे, महानगरप्रमुख प्रविण तिदमे, बळीराम ठाकरे, सूर्यकांत लवटे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अस्मिता देशमाने, पुजा धुमाळ, महानगरप्रमुख शिल्पा चव्हाण उपस्थित होते.
यावेळी विधानसभानिहाय मतदार यादी अद्ययावतकरण्यासाठी बूथ स्तरावर काटेकोर नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नवीन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, तसेच वगळलेल्या मतदारांचा समावेश यावर विशेष भर देण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकाऱ्याने सक्रिय सहभाग नोंदवून संघटन मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV