लातूर - जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय अध्यक्षपदी लक्ष्मण मोरे यांची निवड
लातूर, 10 एप्रिल (हिं.स.)।जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय लिमिटेड लातूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध संचालक मंडळ माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आले होते. त्यात नूतन चेअरमन म्हणून लक्ष्मण मोरे (खोपेगाव
निवड


लातूर, 10 एप्रिल (हिं.स.)।जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय लिमिटेड लातूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध संचालक मंडळ माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आले होते. त्यात नूतन चेअरमन म्हणून लक्ष्मण मोरे (खोपेगाव) तर व्हॉईस चेअरमन म्हणून भीमाशंकर बावगे (हासेगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याबद्दल आशियाना बंगल्यावर नूतन संचालक मंडळ व चेअरमन व व्हॉईस चेअरमन यांनी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे आभार व्यक्त करून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय अध्यक्षपदी लक्ष्मण मोरे व्हॉईस चेअरमन भीमाशंकर बावगे सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व संस्थेचे हित वाढीसाठी

प्रयत्न करणे गरजेचे असून मी आपल्या संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाने आवश्यक प्रयत्न करावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी केले.

यावेळी राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आवासाहेब पाटील जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय

उपाध्यक्ष भीमाशंकर बावगे संचालक तुकाराम कानवटे, संचालक यादवराव सुमठाणे, संचालक श्रीकृष्ण ढवळे, संचालक रामराव साळुंके, बाबसाहेब पत उलांगुडे मनोज, संचालक सूर्यकांत शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून एस डी काटे यांनी कामकाज पाहिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande