‘तत्पर ग्राहकसेवा’, ‘महसूलवाढ’ आणि ‘शून्य थकबाकी’ या त्रिसूत्रीला प्राधान्य - राजेंद्र पवार
सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.)। वीज क्षेत्रात कालच्या कामगिरीवर आज तग धरणे शक्य नसल्याने चालू आर्थिक वर्षात ‘तत्पर ग्राहकसेवा’, ‘महसूलवाढ’ आणि ‘शून्य थकबाकी’ या त्रिसूत्रीला प्राधान्य देत सातत्यपूर्ण कामगिरी करावी, असे निर्देश महावितरणचे संचालक (मानव
‘तत्पर ग्राहकसेवा’, ‘महसूलवाढ’ आणि ‘शून्य थकबाकी’ या त्रिसूत्रीला प्राधान्य - राजेंद्र पवार


सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.)। वीज क्षेत्रात कालच्या कामगिरीवर आज तग धरणे शक्य नसल्याने चालू आर्थिक वर्षात ‘तत्पर ग्राहकसेवा’, ‘महसूलवाढ’ आणि ‘शून्य थकबाकी’ या त्रिसूत्रीला प्राधान्य देत सातत्यपूर्ण कामगिरी करावी, असे निर्देश महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी दिले.

सोलापूर मंडलातील विभाग व उपविभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर आणि सोलापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता सुनील माने उपस्थित होते.

राज्यातील ऊर्जा क्षेत्रात सकारात्मक व लोकाभिमुख बदल होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे वीज क्षेत्राचा चेहरामोहरा बदलत असल्याचे पवार यांनी सांगितले. ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा देण्याबरोबरच महसूल वाढवणे आणि थकबाकी शून्यावर आणण्यावर भर द्यावा. तसेच कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान व प्रभावी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande