एनसीआरटीच्या निर्णयाविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक
मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.) : इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याच्या NCERT च्या निर्णयाविरोधात संभाजी ब्रिगेडने तीव्र नाराजी व्यक्त
ergdfg


मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी

सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.) : इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याच्या NCERT च्या निर्णयाविरोधात संभाजी ब्रिगेडने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय मागे घ्यावा आणि मूळ नकाशा कायम ठेवावा, अशी मागणी भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे ईमेलद्वारे करण्यात आली आहे.

मूळ नकाशाला विरोध झाल्यानंतर त्यात काही तत्कालीन राजपूत राज्ये वगळून बदल करण्यात आले. मात्र, त्या बदलालाही विरोध झाल्यानंतर अखेर संपूर्ण नकाशाच अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ भूतकाळ नसून स्वाभिमान, पराक्रम आणि राष्ट्ररक्षणाची परंपरा असल्याचे अधोरेखित करण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत मराठ्यांनी दिल्लीपर्यंत मजल मारली होती आणि पुढे त्यांचा विस्तार अटकपर्यंत झाला होता, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

राजस्थानातील मराठ्यांच्या मोहिमांचा उल्लेख करत रामपुरा मोहिम (1734–35), बुंदी मोहिम (1730 चे दशक), कक्कोरचे युद्ध (1759), पाटनचे युद्ध (1790), मेर्टा युद्ध (1790) आणि मालपुरा युद्ध (1800) यांसारख्या लढायांमधून मराठ्यांचा पराक्रम व उत्तर भारतातील प्रभाव स्पष्ट दिसून येतो, असे सांगण्यात आले. अनेक राजपूत राज्यांनी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केले होते, असेही नमूद करण्यात आले.

अशा गौरवशाली इतिहासाचे प्रतिनिधित्व करणारे घटक अभ्यासक्रमातून वगळणे दुर्दैवी असून इतिहास सत्य आणि पुराव्यांच्या आधारे पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली.----------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande