
बीड, 10 एप्रिल (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी राजकीय वातावरण तापले असून बिनविरोध निवडीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या पदासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी पतीचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा तसेच गावातील पाणीप्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला.
मात्र, माजी प्रतिस्पर्धी स्वरूपानंद देशमुख यांनी अचानक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक आता चुरशीची होणार आहे.
मस्साजोग ग्रामपंचायतीत एकूण २,२८४ मतदार असून येत्या २९ तारखेला नव्या सरपंचाचे भवितव्य ठरणार आहे. संतोष देशमुख यांच्या निधनामुळे गावात भावनिक वातावरण असतानाच, उर्वरित १८ महिन्यांच्या कार्यकाळासाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण ठरत आहे.
दरम्यान, धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांना अश्विनी देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis