
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल, (हिं.स.)। लोकशाही बळकटीसाठी मतदार यादी पारदर्शक, त्रुटीमुक्त तयार करण्यासाठी शासकीय यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन खा. संदिपान भुमरे यांनी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या यादीच्या विशेष सखोल पुनःनिरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) मॅपिंग संदर्भात सिल्लोड शहरातील शिवसेना भवन येथे खासदार संदीपान भुमरे तसेच आमदार मतदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी खा. भुमरे बोलत होते.
ते म्हणाले, शिवसैनिकांनी सर्कलनिहाय नियोजन करावे. आपल्या आपल्या भागात जाऊन नागरिकांना या मोहिमेबाबत जागरूक करावे. बूथ लेव्हल ऑफिसर यांना सहकार्य करत मतदार यादीतील दुबार नावे व बोगस नावे कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. नवीन मतदारांची नोंदणी आणि नावातील दुरुस्ती करुन घ्यावी. संबंधित भागात राहत नसणाऱ्या नावांची योग्य नोंद करून त्याबाबत प्रशासनाला माहिती द्यावी.
आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथ स्तरावर संघटन मजबूत करत मतदार यादी शुद्धीकरणासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदारयादीत समावेश व्हावा, अपात्र नावे वगळण्यात यावी.
जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, जि.प.तील शिवसेना गटनेता राधाकिसन पठाडे, चंद्रकांत जाधव, नगराध्यक्ष अब्दुल समीर, प्रभाकर काळे, तालुकाप्रमुख केशवराव तायडे, धरमसिंग चव्हाण, देविदास लोखंडे, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, प्रशांत क्षीरसागर, दुर्गाबाई पवार, सभापती विश्वास दाभाडे, संदीप राऊत, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis