
- गृहमंत्री शहा यांचा ऑनलाइन सहभाग
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल (हिं.स.)।
विश्व नवकारमहामंत्र दिनानिमित्त सकल जैन समाज, जितो चॅप्टर फाउंडेशन आणि नवकार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवकार महामंत्र जप कार्यक्रमास पहाटे हिराकाका प्रांगणात सुरवात झाली. पाच हजारांहून अधिक भाविकांनी महामंत्राचा सामूहिक जप केला. उपक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथून ऑनलाइन सहभाग नोंदवला. १०८ देशांतील लाखो भाविकही ऑनलाइन सहभागी झाले होते.
आबालवृद्धांनी पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये उपस्थित राहून शिस्तबद्ध पद्धतीने जप केला. ५००० लोकांच्या एकाग्रतेने आणि णमोकारच्या जयघोषाने परिसरात विलक्षण ऊर्जा निर्माण झाली. सोहळ्यात गणाचार्य पुष्पदंत गुरुदेव व साध्वी डॉ. पुण्यशीला यांचे आशीर्वाद लाभले. भक्तिगीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आली. फोटोबूथ आणि नवकार प्रदर्शनीमुळे उपस्थितांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. कार्यक्रमासाठी हर्षवर्धन जैन व चिदेश जैन यांनी पूर्ण आर्थिक पाठबळ दिले. सामूहिक जपानंतर कार्यक्रमाची सांगतारतीलाल प्रवीणकुमार मुगदिया परिवार, नम्रता ग्रुपतर्फे प्रभावना प्रसादाने झाली.
शहरातील १५० हून अधिक संघटना, महिला मंडळे,
सोहळ्यात जागतिक स्तरावर राबवण्यात आलेल्या १३५१ कोटी नवकार महामंत्र जप अनुष्ठानाची सांगता झाली. १८ नवकार फ्रेम आणि १८ आकर्षक भेटवस्तूंचा लकी ड्रॉ काढण्यात आला. उपक्रमातून एकता, सद्भावना आणि विश्वकल्याणाचा संदेश देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis