डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल, (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. ३६० जणांची तपासणी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आरोग्य केंद्र व विद्यार्थी विकास मंडळ य
अ


छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल, (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. ३६० जणांची तपासणी करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आरोग्य केंद्र व विद्यार्थी विकास मंडळ यांच्यावतीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव १४ एप्रिल दरम्यान सुरु आहे. विद्यापीठ आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक शिबीर आयोजित करण्यात आले. कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे, आरोग्य अधिकारी डॉ.आनंद सोमवंशी, कार्यकारी अभियंता रविंद्र काळे, चिफ रेक्टर डॉ.सुनील नरवडे आदींची उपस्थिती होती.

दिवसभरात विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, विद्यार्थी यांनी शिबिरास लाभ घेतला.यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयतील (घाटी) रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. तर सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य, नेत्ररोग व सर्व रोग तपासणी करण्यात आली. तसेच विद्यापीठ आरोग्य केंद्रातर्फे मौखिक आरोग्य तपासणी, हिमोग्लोबीन, रक्त तपासणीही करण्यात आली. ३६० जणांची तपासणी करण्यात आली.

धूत हॉस्पिटलमधील डॉ.संजय गंडे पाटील, पंकज तायडे, वर्षा निकाळजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय रक्तपेढीचे डॉ.रविना जाजू, डॉ.जूबी बाबू, डॉ.भक्ती पाटील, कोकिळा साबळे, इम्रान अंबेकर, सुजल पवार, खुशाल खोटरे, प्रणिता धंदारे, प्रशांत काकडे, माधव पवार, मझहर शेख यांनी प्रयत्न केले. तसेच आरोग्य केंद्रातील डॉ.आनंद सोमवंशी, डॉ.पल्लवी मानकर, डॉ.पायल जुजेराय, डॉ.सुधीर परमेश्वर, निर्मला खरात, स्मिता पाईकराव आदींनी प्रयत्न केले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande