पुणे - पॅट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल नाही; गणिताची परीक्षा १५ एप्रिल रोजीच
पुणे, 10 एप्रिल (हिं.स.)। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) घेण्यात येणाऱ्या संकलित चाचणी २ (पॅट) या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ११, १५ आणि २२ एप्रिल या दिवशी होणार आहे. १५ एप्रिल रोजीच्या गणिताच्या परीक्षेच्या वेळापत
पुणे - पॅट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल नाही; गणिताची परीक्षा १५ एप्रिल रोजीच


पुणे, 10 एप्रिल (हिं.स.)। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) घेण्यात येणाऱ्या संकलित चाचणी २ (पॅट) या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ११, १५ आणि २२ एप्रिल या दिवशी होणार आहे. १५ एप्रिल रोजीच्या गणिताच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

चाचणी परीक्षेनंतर १० टक्के उत्तरपत्रिकांची यादृच्छिकपणे तपासणी करण्यासह पटपडताळणीसाठी शाळाभेटी करताना प्राधान्याने अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना भेटी देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) या बाबत परिपत्रकाद्वारे माहिती दिली. एससीईआरटीने ९ मार्च रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळांमध्ये ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी अनुक्रमे प्रथम भाषा, तृतीय भाषा या विषयांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ९ मार्च रोजी संचालक डॉ. नंदकुमार बेडसे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात गणिताची परीक्षा १६ एप्रिल रोजी होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी सुधारित परिपत्रक प्रसिद्ध करून पॅट परीक्षा ११ एप्रिल, १५ एप्रिल, २२ एप्रिल या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande