हिंदूंच्या एकजुटीसाठी गावोगावी हनुमान चालीसा पठण केंद्रांची गरज - प्रविण तोगडिया
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल, (हिं.स.)। हनुमान चालीसा पठण हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे हिंदू समाजाच्या एकजुटीसाठी गावोगावी हनुमान चालीसा पठण केंद्र सुरू करण्याचा संकल्प आम्ही केला असून यात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे
अ


छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल, (हिं.स.)। हनुमान चालीसा पठण हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे हिंदू समाजाच्या एकजुटीसाठी गावोगावी हनुमान चालीसा पठण केंद्र सुरू करण्याचा संकल्प आम्ही केला असून यात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडीया यांनी केले.

बजाज नगरातील हायटेक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद, राष्ट्रीय बजरंग दल देवगिरी प्रांत छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे अध्यक्ष जे. के. जाधव, राष्ट्रीय बजरंग दल देवगिरी प्रांत अध्यक्ष सुभाष मोकरिया, प्राचार्य गोविंद ढगे, ए. आर. जाधव, विकास रेगे, डॉ. सुधीर वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी तोगडीया यांनी हिंदू समाजातील जनजागृती, आरोग्य आणि एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी देशभर हिंदू समाजाच्या जनजागृतीसाठी दौरा सुरू केल्याचे सांगितले. तसेच कॅन्सर सर्जन म्हणून ४५ वर्षांचा अनुभव, राजस्थान, यूपी, बिहारमध्ये हजारो शस्त्रक्रिया केल्याचा उल्लेख करत समाजसेवेचा संदेश दिला. यावेळी त्यांनी हिंदू धर्माची विशालता, परंपरा, चार वेदांचे महत्त्व, तसेच पूर्वज आणि कुलदैवत यांची माहिती दिली. विज्ञान आणि सृष्टीच्या उत्पत्तीविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. समाजातील चांगल्या गुणांचे जतन आणि वाईट प्रवृत्तींचा त्याग करण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. कैलास अतकरे यांनी मानले. दरम्यान, सिडको महानगर येथे रवी शर्मा यांच्या समर्थ बिल्डस अँड डेव्हलपर्स कार्यालयाचा शुभारंभडॉ. तोगडीया यांच्या हस्ते करण्याब आला.

यावेळी पं. स. उपसभापत बाळासाहेब गाडे, सरपंच सुनील काळे, उद्योजक कैलास भोकरे सचिन प्रधान, आण्णा कांडेक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्य शेवटी समाजातील सर्व घटकांन एकत्र येऊन गरजूंना मदत करावी भुकेल्यांना अन्न द्यावे आणि आरोग्यदायी व एकजूट समाज घडवावा, असा संदेश देण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनाकडून तगड बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande