परभणीत महापालिकेच्या विशेष सभेवरून वाद ; विरोधकांचे ठिय्या आंदोलन
परभणी, 10 एप्रिल (हिं.स.) : महानगरपालिकेची विशेष सभा विरोधी सदस्यांचे मुद्दे न ऐकता अचानक संपविण्यात आल्याच्या निषेधार्थ भाजपा, काँग्रेस तसेच जनता विकास आघाडीच्या सदस्यांनी गुरुवारी आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. विरोधी पक्षांच्या सदस्यांच
विशेष सभा गुंडाळल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन


परभणी, 10 एप्रिल (हिं.स.) : महानगरपालिकेची विशेष सभा विरोधी सदस्यांचे मुद्दे न ऐकता अचानक संपविण्यात आल्याच्या निषेधार्थ भाजपा, काँग्रेस तसेच जनता विकास आघाडीच्या सदस्यांनी गुरुवारी आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

विरोधी पक्षांच्या सदस्यांचा आरोप आहे की, विशेष सभेदरम्यान त्यांनी मांडलेले महत्त्वाचे विषय पिठासीन अधिकाऱ्यांनी न ऐकता सभा अचानक गुंडाळली. या प्रकारामुळे संतप्त सदस्यांनी थेट आयुक्त Nitin Narvekar यांची भेट घेत तीव्र नाराजी व्यक्त केली.

आयुक्तांनी परिस्थिती शांत करण्यासाठी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी गेल्या दोन सभांपासून सुरू असलेल्या एकाधिकारशाही कारभारावर जोरदार टीका करत निषेध नोंदविला.

या आंदोलनात वैशाली दैठणकर, विजयराव जामकर, अक्षय देशमुख, डॉ. केदार खटींग, मिलींद बामणीकर, सागर गंगाळे, अर्जुन सामाले, अद्वैत सांगळे, गणेश टाक, समरीन फारुखी आणि उजमा बेगम यांसह अनेक सदस्य सहभागी झाले होते.

दरम्यान, या घटनेमुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव वाढल्याचे चित्र असून, पुढील सभांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande