ऑलिम्पिक स्वप्नांचा पाठपुरावा; लक्ष्यवेध निवड चाचणीला प्रारंभ
रायगड, 10 एप्रिल (हिं.स.) : क्रीडा क्षेत्रात भावी आंतरराष्ट्रीय विजेते घडवण्याच्या उद्देशाने शासनाच्या “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत मुंबई विभागीय टेबल टेनिस निवड चाचणीला न्यू पनवेल येथे दिमाखात सुरुवात झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्
**न्यू पनवेलमध्ये ‘मिशन लक्ष्यवेध’ टेबल टेनिस निवड चाचणीला दिमाखात सुरुवात**  न्यू पनवेल : क्रीडा क्षेत्रात भावी आंतरराष्ट्रीय विजेते घडवण्याच्या उद्देशाने शासनाच्या “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत मुंबई विभागीय टेबल टेनिस निवड चाचणीला न्यू पनवेल येथे ९ एप्रिल रोजी दिमाखात सुरुवात झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या यजमानपदाखाली ही चाचणी आयोजित करण्यात आली आहे.  विभागीय उपसंचालक नवनाथ फरताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या या निवड प्रक्रियेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर सुहास व्हनमाने, आयोजक जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड प्रकाश वाघ, निवड समिती सदस्य व मार्गदर्शक श्रेया बोर्डवेकर, सुचिता ढमाले, निळकंठ आखाडे, संजय कडू, अनिल बंदेल आणि असद सय्यद यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  या निवड चाचणीसाठी मुंबई विभागातून एकूण ८३ खेळाडूंनी नोंदणी केली होती. मात्र, “मिशन लक्ष्यवेध”च्या कठोर निकषांनुसार छाननी केल्यानंतर केवळ ३४ अव्वल खेळाडूंना अंतिम चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या खेळाडूंमध्ये २ आंतरराष्ट्रीय, १५ राष्ट्रीय आणि १८ राज्यस्तरीय पदक विजेत्यांचा समावेश असल्याने स्पर्धेची पातळी अत्यंत उच्च दर्जाची ठरली आहे.  या निवड प्रक्रियेत केवळ विजय-पराजयावर भर न देता खेळाडूंच्या सर्वांगीण क्षमतेचे मूल्यांकन केले जात आहे. फिटनेस टेस्ट, स्किल टेस्ट आणि प्रत्यक्ष सामन्यातील कामगिरी या तीन स्तरांवर खेळाडूंची कसून परीक्षा घेतली जात आहे.  “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत निवड झालेल्या खेळाडूंना पुढील टप्प्यात विशेष प्रशिक्षण व आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे हे खेळाडू भविष्यात ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम ठरतील, असा विश्वास क्रीडा विभागाने व्यक्त केला आहे.


रायगड, 10 एप्रिल (हिं.स.) : क्रीडा क्षेत्रात भावी आंतरराष्ट्रीय विजेते घडवण्याच्या उद्देशाने शासनाच्या “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत मुंबई विभागीय टेबल टेनिस निवड चाचणीला न्यू पनवेल येथे दिमाखात सुरुवात झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या यजमानपदाखाली ही चाचणी आयोजित करण्यात आली आहे.

विभागीय उपसंचालक नवनाथ फरताडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या निवड प्रक्रियेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर सुहास व्हनमाने, आयोजक जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड प्रकाश वाघ, निवड समिती सदस्य व मार्गदर्शक श्रेया बोर्डवेकर, सुचिता ढमाले, निळकंठ आखाडे, संजय कडू, अनिल बंदेल आणि असद सय्यद यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या निवड चाचणीसाठी मुंबई विभागातून एकूण ८३ खेळाडूंनी नोंदणी केली होती. मात्र, “मिशन लक्ष्यवेध”च्या कठोर निकषांनुसार छाननी केल्यानंतर केवळ ३४ अव्वल खेळाडूंना अंतिम चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या खेळाडूंमध्ये २ आंतरराष्ट्रीय, १५ राष्ट्रीय आणि १८ राज्यस्तरीय पदक विजेत्यांचा समावेश असल्याने स्पर्धेची पातळी अत्यंत उच्च दर्जाची ठरली आहे.

या निवड प्रक्रियेत केवळ विजय-पराजयावर भर न देता खेळाडूंच्या सर्वांगीण क्षमतेचे मूल्यांकन केले जात आहे. फिटनेस टेस्ट, स्किल टेस्ट आणि प्रत्यक्ष सामन्यातील कामगिरी या तीन स्तरांवर खेळाडूंची कसून परीक्षा घेतली जात आहे.

“मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत निवड झालेल्या खेळाडूंना पुढील टप्प्यात विशेष प्रशिक्षण व आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे हे खेळाडू भविष्यात ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम ठरतील, असा विश्वास क्रीडा विभागाने व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande