एनएसयूआय अध्यक्षपदी शरद गुमटे यांची नियुक्ती
खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या (NSUI) अध्यक्षपदी शरद गुमटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सात रस्ता, सोलापूर येथील जनवात्सल्य कार्यालयात खासदार प्रणिती शिं
gdff


खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या (NSUI) अध्यक्षपदी शरद गुमटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सात रस्ता, सोलापूर येथील जनवात्सल्य कार्यालयात खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी युवकांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची विचारधारा अधिक बळकट करण्यासाठी NSUI ची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. संघटना अधिक सक्षम करण्यासाठी कार्य करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

या प्रसंगी सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, काँग्रेस मीडिया सेल प्रमुख तिरुपती परकीपंडला यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद गुमटे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास अनिकेत चंदनशिवे, कुमार नागराळे, जयेश केले, विशाल शिंदे, विष्णू पवार, संकेत जगदाळे, कृष्णा सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande