आ.सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांची घेतली भेट
सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.)। आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन यांची सदिच्छा भेट घेतली व जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा वेग अधिक वाढवि
fgfef


सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.)। आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन यांची सदिच्छा भेट घेतली व जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा वेग अधिक वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर विशेष भर देण्यात आला.यावेळी त्यांच्याशी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास योजना, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रगतीबाबत सखोल विचारविनिमय करत जनहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा प्रत्यक्ष फायदा पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा झाली. तसेच जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देणे, प्रशासकीय अडथळे दूर करून पारदर्शक व गतिमान प्रशासन सुनिश्चित करणे यावरही सकारात्मक चर्चा केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande