सोलापुरात शिवसेनेच्या (उबाठा) पदाधिकाऱ्यांचा मनसेकडून सत्कार
सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.) : सोलापुरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सत्कार करण्यात आला. शहर उत्तर-मध्य जिल्हाप्रमुखपदी प्रताप
gfded


सोलापूर, 10 एप्रिल (हिं.स.) : सोलापुरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सत्कार करण्यात आला.

शहर उत्तर-मध्य जिल्हाप्रमुखपदी प्रताप चव्हाण, दक्षिण सोलापूर जिल्हाप्रमुखपदी शरणराज केंगनाळकर, सोलापूर लोकसभा प्रमुखपदी संजय पौळ, तर महानगर प्रमुखपदी महेश धाराशिवकर यांची निवड करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर सोन्या मारुती चौकातील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मनसेच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात मनसैनिकांनी उत्साहात सहभाग नोंदवला.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके, वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, उपाध्यक्ष विश्वास गजभार, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष गणेश भोसले, समर्थ माळगे, अभिषेक इरकल तसेच इतर पदाधिकारी व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande