प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांना मुदतवाढ
परभणी, 10 एप्रिल (हिं.स.)।प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तसेच अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने ‘ट्रेन ऑन डिमांड’ अंतर्गत चालविण्यात येणार्या विशेष गाड्यांच्या धावण्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेत
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांना मुदतवाढ


परभणी, 10 एप्रिल (हिं.स.)।प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तसेच अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने ‘ट्रेन ऑन डिमांड’ अंतर्गत चालविण्यात येणार्या विशेष गाड्यांच्या धावण्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व गाड्या विद्यमान थांबे आणि वेळापत्रकानुसारच धावणार असल्याने प्रवाशांना पूर्ववत सुविधा मिळणार आहेत.

मुदतवाढ देण्यात आलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 07605 तिरुपती-अकोला विशेष गाडी शुक्रवारी धावणार असून तिची सेवा वाढविण्यात आली आहे, तर गाडी क्रमांक 07606 अकोला-तिरुपती विशेष गाडी रविवारी धावणार असून तिची सेवा 12 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच गाडी क्रमांक 07015 नांदेड-तिरुचेंनुर विशेष गाडी शनिवारी धावणार असून तिची सेवा 11 एप्रिल 2026 पर्यंत, तर गाडी क्रमांक 07016 तिरुचेंनुर-नांदेड विशेष गाडी रविवारी धावणार असून तिची सेवा 12 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

याशिवाय गाडी क्रमांक 07189 नांदेड-धर्मावरम विशेष गाडी शुक्रवारी धावणार असून तिची सेवा 10 एप्रिल 2026 पर्यंत, तर गाडी क्रमांक 07190 धर्मावरम-नांदेड विशेष गाडी रविवारी धावणार असून तिची सेवा 12 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच गाडी क्रमांक 07609 जालना-तिरुचेंनुर विशेष गाडी सोमवारी धावणार असून तिची सेवा 13 एप्रिल 2026 पर्यंत, तर गाडी क्रमांक 07610 तिरुचेंनुर-जालना विशेष गाडी मंगळवारी धावणार असून तिची सेवा 14 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेऊन आपला प्रवास नियोजनबद्ध करावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केले असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande