छ. संभाजीनगर - श्रीदत्त आश्रम उत्तराधिकारीपदी स्वामी योगेंद्रगिरी महाराज यांची निवड
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल, (हिं.स.)। गंगापूर तालुक्यातील मालुंजा येथील श्री दत्त आश्रमाचे उत्तराधिकारी म्हणून हभप. स्वामी योगेंद्रगिरी महाराज यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली. स्वामी लक्ष्मणगिरी महाराज समाधीस्थ झाल्याने रिक्त झालेल्या
छ. संभाजीनगर - श्रीदत्त आश्रम उत्तराधिकारीपदी स्वामी योगेंद्रगिरी महाराज यांची निवड


छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल, (हिं.स.)। गंगापूर तालुक्यातील मालुंजा येथील श्री दत्त आश्रमाचे उत्तराधिकारी म्हणून हभप. स्वामी योगेंद्रगिरी महाराज यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली. स्वामी लक्ष्मणगिरी महाराज समाधीस्थ झाल्याने रिक्त झालेल्या या पदावर, संतांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.

या सोहळ्यासाठी गोदाधाम सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्यासह श्रीमंत १००८ स्वामी विष्णुगुरू महाराज, महंत हरिशरणगिरी महाराज, नारायणानंद गिरी महाराज यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक नामवंत संत-महंत उपस्थित होते. उपस्थित साधू-संतांनी

आणि भाविकांनी एकमुखाने स्वामी योगेंद्रगिरी महाराज यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करत त्यांना आशीर्वाद दिले.यावेळी आमदार रमेश बोरणारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमामध्ये कीर्तन, भजन आणि हरिपाठ, अशा विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी मालुंजा ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande