सहकार धोरण विभागनिहाय ठरवण्याची गरज - विवेक जुगादे
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल, (हिं.स.)। ''सहकार क्षेत्र व्यापक आहे. राज्यात ४० विविध विभागांमध्ये ते विस्तारलेले आहे. त्यामुळे नवीन सहकार धोरण तयार करताना ते विभागनिहाय ठरवावे'', अशी ठाम मागणी सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे यांनी केली. राज
सहकार धोरण विभागनिहाय ठरवण्याची गरज - विवेक जुगादे


छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल, (हिं.स.)। 'सहकार क्षेत्र व्यापक आहे. राज्यात ४० विविध विभागांमध्ये ते विस्तारलेले आहे. त्यामुळे नवीन सहकार धोरण तयार करताना ते विभागनिहाय ठरवावे', अशी ठाम मागणी सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे यांनी केली. राज्याच्या नव्या सहकार धोरणासाठी तयार होत असलेल्या अहवालात हा मुद्दा मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वर्धमान नागरी सहकारी बँकेच्या सभागृहात 'सहकार क्षेत्रातील नव्या धोरणावर चर्चा' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतिलाल सिंगी यांनी जुगादे यांनी आतापर्यंत २० जिल्ह्यांत दौरे करून सहकार क्षेत्रातील

विविध घटकांशी संवाद साधल्याचे सांगितले. जुगादे म्हणाले, सहकारात राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात अडीच लाख विविध प्रकारच्या सहकारी संस्था असून, आठ कोटी लोक त्याशी जोडले गेले आहेत. बँका, पतसंस्था, साखर कारखाने, मत्स्य व्यवसाय, वस्त्रोद्योग आदी क्षेत्रांच्या सहकार क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर होत असून, तो पूर्णपणे थांबवणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारमुक्त सहकार ही काळाची गरज आहे. भ्रष्टाचार थांबला नाही, तर सहकार क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार नाही', असेही त्यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande