
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल (हिं.स.)।
जिल्ह्यातील कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जानेवारी ते डिसेंबर २०२६ ६३३ प्रारूप प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. प्रभाग रचना प्रसिद्ध होताच गावगाड्याचे राजकारण चांगलेच तापले असून, इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
प्रारूप प्रभाग रचनेवर १३ एप्रिल या कालावधीत हरकती व सूचना घेण्यात येणार आहेत. त्यावर १६ पर्यंत सुनावणी होऊन ४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेत गावातील प्रत्येक घर आणि लोकसंख्या यांचा सूक्ष्म विचार करून प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात अचूक प्रतिनिधित्व मिळावे, हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे.
प्रभाग रचना जाहीर झाल्याने सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. लवकरच त्यामुळे ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रभाग रचनेवर कोणत्या भागात हरकती घेतल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग रचनेसोबतच जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्य पदांच्या रिक्त असलेल्या जागांसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रमही सुरू झाला आहे.
थेट सरपंच पदाच्या ६ व सदस्य पदाच्या ३७अशा एकूण ४३ रिक्त जागांसाठी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. या जागांसाठी २८ तारखेला मतदान व २९ रोजी मतमोजणी होईल.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis