रत्नागिरी : डेरवण येथे २४ एप्रिलला ॲथलेटिक्स निवड चाचणी
रत्नागिरी, 11 एप्रिल, (हिं. स.) : राज्यातील क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी ''मिशन लक्षवेध'' उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ॲथलेटिक्स क्रीडा निपुणता केंद्रासाठी २० खेळाडूंची निवड चाचणी २४ एप्रिलला सकाळी ८ वाजत
रत्नागिरी : डेरवण येथे २४ एप्रिलला ॲथलेटिक्स निवड चाचणी


रत्नागिरी, 11 एप्रिल, (हिं. स.) : राज्यातील क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'मिशन लक्षवेध' उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ॲथलेटिक्स क्रीडा निपुणता केंद्रासाठी २० खेळाडूंची निवड चाचणी २४ एप्रिलला सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही चाचणी डेरवण येथील क्रीडा संकुलात होईल.

चाचणीसाठी २१ वर्षांखालील मुले व मुलींना सहभागी होता येईल. निवड झालेल्या खेळाडूंना या केंद्रात अनिवासी स्वरूपात उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये क्रीडासाहित्य, किट, देशांतर्गत व परदेशातील स्पर्धा सहभाग खर्च, वैद्यकीय उपचार, विमा आणि स्पोर्ट्स सायन्स सेंटर अशा जागतिक दर्जाच्या सुविधा मोफत पुरवल्या जाणार आहेत. इच्छुक खेळाडूंनी आपली नोंदणी २३ एप्रिलपर्यंत गुगल लिंकवर करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात किंवा क्रीडा कार्यकारी अधिकारी ऐश्वर्या सावंत यांच्याशी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande