
रत्नागिरी, 11 एप्रिल, (हिं. स.) : भारतीय जनता पार्टी शहर मंडळाचे सक्रिय कार्यकर्ता संमेलन पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.संमेलनाचे संयोजक राजन पटवर्धन, प्रसाद बाष्टे यांनी प्रस्तावना करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शपथ घेऊन करण्यात आली. “प्रथम राष्ट्र व पक्ष, मग स्वतः” या विचाराला अनुसरून कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
संमेलनात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः नगरपालिका स्तरावरील कामे, प्रभागांमधील समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टीची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काय प्रयत्न करावेत, याबाबतही मार्गदर्शन व चर्चा झाली.बैठकीत कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव मांडत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रभाग क्रमांक सहामधील विशाखा भिडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले विचार व्यक्त केले. कार्यकर्ता कसा असावा आणि त्यांनी काय केले पाहिजे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.व्यासपीठावर शहराध्यक्ष दादा ढेकणे, संयोजक राजन पटवर्धन, प्रसाद बाष्टे, महिला शहराध्यक्ष भक्ती दळी, सरचिटणीस नीलेश आखाडे, संदीप सुर्वे, विशाखा भिडे आदी उपस्थित होते.
--------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी